• Fri. Mar 14th, 2025

रिपाई वाहतुक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राहुल गाडेकर व शहर उपाध्यक्षपदी मुशरफ शेख यांची नियुक्ती

ByMirror

Mar 14, 2025

विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे -सुशांत म्हस्के

नगर (प्रतिनिधी)- विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे. तुमच्या खाण्यावर, बोलण्यावर व राहण्यावर प्रतिबंध होत असताना लोकशाहीची मुल्ये धोक्यात आली आहे. या शक्तींना तोंड देण्यासाठी सर्व अल्पसंख्यांकांना एकत्र यावे लागणार असल्याचे प्रतिपादन रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.


रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (गवई) वाहतुक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी म्हस्के बोलत होते. यावेळी रिपाई ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष विजय शिरसाठ, उपाध्यक्ष विल्सन रुकडीकर, भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे, जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, हुसेन चौधरी, संजय पवार, शाम ससाणे, निखील मगर, रईस शेख, विशाल भिंगारदिवे, शाहबाज शेख, जावेद शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वाहतुक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राहुल गाडेकर व शहर उपाध्यक्षपदी मुशरफ शेख यांची नियुक्ती करण्यात करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. विजय शिरसाठ म्हणाले की, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालत आहे. युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वसामान्यांची प्रश्‍ने सोडवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


नवनिर्वाचित वाहतुक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल गाडेकर व शहर उपाध्यक्ष मुशरफ शेख यांनी मोठ्या संख्येने बेरोजगार युवक रिक्षा, टेम्पो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यांचे अनेक प्रश्‍न असून, ते संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *