• Wed. Feb 5th, 2025

लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती

ByMirror

Feb 1, 2025

शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड

नगर (प्रतिनिधी)- लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


प्रा. युनुस शेख जामखेड येथील ॲग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक असून, शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक कार्यात ते योगदान देत आहे. शिक्षकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. मुप्टा उर्दू शिक्षक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत आहे.

तसेच गरजू घटकातील शिक्षणाचा प्रश्‍न, सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने कार्य सुरु असून, या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल राज्य न्याय सल्लागार आरिफ शेख व जिल्हाध्यक्ष अय्युब शेख यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *