सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली -दत्ता गाडळकर
नगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली आहे. स्त्री शिक्षणाने समाजाची प्रगती साध्य झाली. आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज असून, आजच्या प्रत्येक युवतीने सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन शिक्षणाने आपले ध्येय गाठण्याचे आवाहन भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गाडळकर बोलत होते. याप्रसंगी नेत्रदूत जालिंदर बोरुडे, राजेंद्र एकाडे, विनायक निमसे, अनिल निकम, सचिन जाधव, संजय ताजणे, मोहन कोऱ्हे आदी उपस्थित होते.
पुढे गाडळकर म्हणाले की, स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजच्या कर्तृत्ववान स्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले.