मुलींच्या शिक्षणाची व स्त्री जन्माच्या स्वागत करण्याचा निर्धार
नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश सचिव सुरेखाताई विद्ये, नगर शहर विधानसभा प्रमुख कालिंदी केसकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रियाताई जानवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष संध्या पावसे, शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्षा मीराताई सरोदे, महिला मोर्चा सरचिटणीस ज्योती दांडगे, रेणुका करंदीकर, श्वेता झोंड (पंधाडे), नीता फाटक, अर्चना बनकर, सोनाली पाठक, सुरेखा जंगम, विद्या कुलकर्णी, उज्वला भांगे, सुजाता पुजारी, रेखा मैड, प्रभा पेंडसे आदींसह महिला उपस्थित होत्या.
क्रांतिज्योती सावित्री फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन शिक्षणाची ज्योत समाजात तेवत ठेवण्यासाठी मुलींच्या शिक्षणाची व स्त्री जन्माच्या स्वागत करण्याचा निर्धार महिलांनी केला. राज्यातील महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा मान-सन्मान वाढविला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.