प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार
मुंबई (प्रतिनिधी)- आपल्या ठसकेबाज लावणीने चंद्रमुखीतील चंद्राने सर्वांना घायाळ केले. आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या बाई गं…ही बैठकीची लावणीला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. तर आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे. अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याला रंगत असून, ही लावणी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे.
या गाण्यासाठी अमृता काळ्या रंगाच्या नऊवारीवर हे सादरीकरण केले आहे. चित्रीकरणाच्या दिवशी… चंद्राचा संपूर्ण महाल समया, पणत्या, लामणदिव्यांनी सजवण्यात आला होता. दिव्यांच्या लखलखाटात, अमृता जेव्हा काळी साडी नेसून आली तेव्हा सुमारे पावणे दोनशे लोकांचे युनिट तिच्याकडे एकटक बघत राहिले. तिच्यावर पडणारा तो दिव्यांचा प्रकाश तिचे सौंदर्य अधिकच तेजस्वी करत होते. सर्व युनिट त्यावेळी भारावून गेले होते.
चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.