पदक पटकाविलेल्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत अहमदनगर रायफल ॲण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी यश संपादन करुन पदकांची कमाई केली. अकलूज (जि. सोलापूर) येथे झालेल्या या स्पर्धेत नगरच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट नेमबाजीची छाप पाडली.
या स्पर्धेत कार्तिक कोल्हे (19 ओपन साइड गट) सुवर्ण पदक, श्रावणी भगत (14 एअर पिस्तोल गट) रौप्य पदक, चैतन्य गंधाडे (14 पीप साइड गट) रौप्य पदक, यश कदम (19 पीप साइड गट) कास्य पदक, स्वामिनी जेजूरकर (14 एअर पिस्तोल गट) कास्य पदक पटकाविले. या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडूना प्रशिक्षक छबूराव काळे, आलिम शेख, ऋषीकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, विशाल गर्जे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.