रामजन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचे अनुसूचित मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे केडगाव मध्ये उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी स्वागत केले.
शहरात कार्यक्रमानिमित्त आलेले कांबळे यांचे हॉटेल सचिन येथे स्वागत करुन, अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा केडगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कांबळे यांच्याशी यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे, माजी नगरसेवक मनोज साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश सातपुते, भूषणजी गुंड, लक्ष्मीकांत घोडके आदींसह केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.