अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जिल्हा रुग्णालय व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे व डॉ. संदीप कोकरे यांनी ठोंबरे यांचा सत्कार केला. यावेळी प्रहारचे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राजेंद्र पोकळे, सतीश अहिरे, दत्ता धाडगे, राहुल ठोंबरे आदी उपस्थित होते.

संजय ठोंबर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी 37 वर्ष सेवा करुन निवृत्त होत असल्याने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. ठोंबरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नेहमीच दिव्यांग व गरजू घटकातील रुग्णांना सहकार्य करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहणार असल्याचे ॲड. पोकळे यांनी सांगितले.