गावातील मोहरमच्या मिरवणुकीतून धार्मिक एकतेचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोहरमनिमित्त ताजिया व सवारी विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि.29 जुलै) उत्साहात पार पडली. विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम भाविकांनी सहभागी होऊन धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले. गावातून पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या या ताजिया मिरवणुकिचे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
शनिवारी सकाळी निघालेली ही मिरवणूक संध्याकाळ पर्यंत पारंपारिक वाद्यांच्या गजरात सुरु होती. गावात ठिकठिकाणी ताजिया व सवारीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या हसन-हुसेनच्या निनादात भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या वतीने गावात नऊ दिवस मजलिस व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सवारी गुलाब शेख यांनी उचलली होती.

मोहरम उत्सवात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, बशीरभाई शेख, दिलीप शेख, माजी सरपंच साहेबराव बोडखे, नवाब शेख, आदम शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, आदर्श माता पुरस्कार प्राप्त ताराभाभी शेख, छन्नू शेख, जुबेदा शेख, रुक्साना शेख, बेबीताई शेख, रऊफभाभी शेख, शादाब शेख, मुमताज शेख, अब्दुल शेख, हबिब शेख, सुलताना शेख, अकबर शेख, मोईन शेख सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे, होमगार्ड अनिल पवार उपस्थित होते.