आमदार जगताप यांना निवेदन
माणुसकी व सेवाभावाने क्रांतीज्योती संस्थेचे कार्य -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- माणुसकी व सेवाभावाने क्रांतीज्योती संस्थेचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. वंचित घटकातील समाजाला प्रवाहात आणण्याच्या कार्याने गरजूंना आधार मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम व गरजूंना दिला जाणारा आधार सामाजिक क्रांतीपर्वाची नांदी ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या शिष्टमंडळाने आमदार जगताप यांची भेट घेऊन संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या कार्याबद्दल आमदार जगताप यांनी गौरवोद्गार काढले. तर संस्थेच्या जागेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बनकर, नितिन डागवाले, नंदकुमार नेमाने, भाऊसाहेब कोल्हे, तुषार फुलारी, राहुल साबळे, सुभाष गोंधळे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
क्रांतीज्योती संस्थेच्या माध्यमातून गरजू घटकातील विद्यार्थ्यांच्या कुलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमाबरोबर विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षरोपण, महिला सक्षमीकरण, युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शन आदी उपक्रम सातत्याने सुरु आहेत.
तसेच संस्थेमार्फत वधु-वर परिचय मेळावा घेण्याचा मानस आहे. मात्र संस्थेकडे जागा नसल्याने अनेक सामाजिक उपक्रम घेण्यास अडचण निर्माण येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून संस्थेला जागा उपलब्ध झाल्यास या सामाजिक कार्याला आनखी गती देता येणार असल्याचे गणेश बनकर यांनी सांगितले.