रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
यश पॅरामेडिकल व बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी आणि बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर ( सुपा )येथे अत्यल्प दरात रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 50 प्रकारच्या विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या, तर अनेक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व कामकाज कर्डिले बिरो नर्सिंग होम यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी कर्डिले बिरो नर्सिंग होम संस्थेच संचालक कर्डीले सर तसेच बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक सारंग कुलकर्णी यांनी शिबिराचे आयोजन यशस्वी केले.
शिबिरामध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये हिमोग्लोबिन, साखर, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन यासह इतर महत्त्वाच्या रक्ततपासण्यांचा समावेश होता. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची सखोल माहिती मिळण्यास मदत झाली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी यश पॅरामेडिकलच्या प्राचार्या मंगल कर्डिले, संस्थेतील विद्यार्थिनी तसेच बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामातून आरोग्यसेवेचा अनुभव घेतल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रशिक्षणाला देखील मोठा लाभ झाला. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या व वेळेवर आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली. तसेच रक्तदान शिबिरातून गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली.
