कानडे परिवाराचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधननिमित्त कानडे परिवाराच्या वतीने पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम राबविण्यात आला. कुटुंबापासून लांब देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांना राखी बांधून देशातील बांधव सदैव तुमच्या सोबत असल्याची जाणीव त्यांना करुन देण्यात आली.
शहरा जवळ असलेल्या एमआयआरसी सेंटर मध्ये सुरेखा कानडे यांनी सैनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे, सोहम कानडे आदी कानडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सुरेखा कानडे म्हणाल्या की, देश रक्षणाच्या कर्तव्यावर असलेले सैनिकांना अनेक सण-उत्सव साजरे करता येत नाही. सण-उत्सव काळात ते कुटुंबापासून लांब असतात. त्यांना कुटुंबाची कमतरता भासू नये, म्हणून त्याच आपुलकी व जिव्हाळ्ने रक्षाबंधनाचा सण त्यांच्या समवेत साजरा करण्यात आला आल्याचे त्यांनी सांगितले. संतोष कानडे यांनी सैनिक देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
