• Mon. Jun 2nd, 2025

सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत अपहार प्रकरणी सहकार खात्याकडून चौकशी आधिकारी नियुक्त

ByMirror

Jan 29, 2023

1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरण

घोटाळ्यास जबाबदार असणार्‍या कर्जत सैनिक बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला बडतर्फ करा अन्यथा उपोषण -अरुण रोडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेत चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व काही संचालकांना हाताशी धरुन कर्जत सैनिक बँकेचा शाखा व्यवस्थापकाने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार केल्याचा आरोप करुन त्याला बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रोडे यांनी दिला आहे.

कर्जत सैनिक बँकेचा शाखा व्यवस्थापक असलेल्या फरांडे गेली 10 वर्ष कार्यरत होता. या काळात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार झाला असल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे दाखल आहेत. कर्ज फायली, बोगस चेक, आदी अन्य प्रकाराच्या तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी झाल्यास फरांडेसह त्याला पाठबळ देणारे मुख्यकार्यकारी आधिकारी व चेअरमन हे देखील चौकशीच्या फेर्‍यात सापडणार आहेत. मुख्यकार्यकारी आधिकार्‍यांच्या मर्जीतील फरांडे असल्याने त्याच्यावर आद्यपर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याचे म्हंटले आहे. त्याला त्वरित बँक कामकाजापासून दूर ठेवत चौकशी होईपर्यंत बडतर्फ करण्याची मागणी रोडे यांनी केली आहे.

जबाबदारी लिपिकांवर ढकलण्याचा आधिकार्‍याचां डाव?
1 कोटी 79 लाख अपहाराच्या प्रकरणात जबाबदार असणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ सुटण्यासाठी सदर अपहार लिपिकांवर ढकलत असल्याचा प्रकार समोर आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःच्या अज्ञानापोटी पारनेर, कर्जत पोलीस स्टेशनला लिपिकांच्या विरोधात तक्रार अर्ज देण्याचा प्रयत्न केला. परंतु पारनेर, कर्जत पोलिसांनी आर्थिक घोटाळ्याची रक्कम कोट्यावधीच्या घरात असल्याने सदर तक्रार आर्थिक गुन्हे विभाग नगर शाखा येथे करावी असा सल्ला दिला. या प्रकरणात फक्त लिपिकाला गुंतवण्याचा डाव ओळखून आर्थिक विभाग नगर शाखेनेही शासकीय लेखापरीक्षकांचा अहवाल घेऊन येण्याचे सुचवत त्यांना माघारी धाडले.

संजय निराधार योजनेतही असाच प्रकार करण्यात आला होता. त्यात तत्कालीन लिपीक दीपक आनारसे याला बळीचा बकरा बनवत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मुख्य सूत्रधार बचावले गेले. असाच प्रकार पुन्हा कोट्यावधीच्या चेक प्रकरणात आखला होता, मात्र मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आखलेला डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.त्यामुळे पोलिसांनी सखोल माहिती घेऊनच व सहकार खात्याचा लेखापरीक्षणाचा शासकीय अहवाल आल्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी सभासद विनायक गोस्वामी, माजी सैनिक बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन व कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *