गरजू घटकातील मुलांना आधार देण्याचे भालसिंग यांचे कार्य प्रेरणादायी -भुतारे
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी त्यांचा सत्कार केला. भालसिंग हे अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष असून, सामाजिक क्षेत्रात ते निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत.
निराधार मुलांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देणारे भालसिंग यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याने गरजू घटकातील मुलांना आधार मिळत असल्याचे भुतारे यांनी सांगितले.