• Wed. Jul 2nd, 2025

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षपदी डॉ. संजय आसनानी

ByMirror

Jul 1, 2025

सचिवपदी प्रशांत मुनोत व खजिनदारपदी दिलीप कुलकर्णी यांची नियुक्ती

नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात कार्यात योगदान देऊन वंचित, दुर्बल घटकांना मदतीचा हात देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष 2025-26 ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षपदी डॉ. संजय आसनानी, सचिवपदी प्रशांत मुनोत व खजिनदारपदी दिलीप कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.


लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक कार्य सुरु आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कोरोना काळात क्लबने घर घर लंगर सेवेच्या माध्यामातून मोठे कार्य केले, तसेच मागील वर्षी कन्यादान, महिला सक्षमीकरण, युवतींना स्वसंरक्षणाचे धडे व गरजू मुलींसाठी सायकल वाटप आदी उपक्रम राबविले. या उपक्रमाची दखल इंटरनॅशनल लायन्सने घेऊन क्लबला ॲवॉर्डने देखील सन्मान केला आहे. दरवर्षा प्रमाणे जूनमध्ये नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून, क्लबच्या माध्यमातून सामाजिक उद्दीष्ट समोर ठेऊन वर्षभर सामाजिक कार्य केले जाणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष डॉ. संजय आसनानी यांनी दिली.


नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय आसनानी मॅक्सो फेशियल सर्जन आणि दंत चिकित्सक आहेत. मागील 25 वर्षापासून दंत सेवा देत आहे. ते लायन्सचे मागील 16 वर्षापासून सक्रीय सदस्य आहे. यापूर्वी त्यांनी लायन्स क्लबचे जबाबदारीचे पद भूषवले आहे. सचिव प्रशांत मुनोत उद्योजक असून ते रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य आहेत. सामाजिक क्षेत्रात आणि लायन्स मध्ये ते मागील 17 वर्षापासून कार्यरत आहेत. दिलीप कुलकर्णी हे क्लबचे ज्येष्ठ सदस्य असून, इन्शुरन्स प्रतिनिधी आणि वाहन सल्लागार आहेत. ते देखील मागील 25 वर्षापासून लायन्सच्या सामाजिक चळवळीत योगदान देत आहेत. या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *