कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम
विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्ट अॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पचे आयोजन केले आहे. 15 ते 21 एप्रिल दरम्यान होणार्या या सात दिवसीय समर कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे आवाहन गीतांजली रोहित लाहोर-लोटके व रोहित अनिल लाहोर यांनी केले आहे.
15 एप्रिल रोजी आर्ट अॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पचे शुभारंभ होणार आहे. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला, वुड थाळी मेकिंग अॅण्ड पेंटिंग, ग्लास पेंटिंग, थ्रीडी ग्रीटिंग कार्ड, थ्रीडी ओरिगामी वर्क व बॉटल वर्क यामध्ये शिकविण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. तोफखाना, ठाकूर गल्ली येथील ग्रीन अॅपल अकॅडमीत दुपारी 12 ते 2 या वेळेत तर दुसरी बॅच आदर्शनगर विद्या कॉलनी येथील शौर्य क्लासेस येथे संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत समर कॅम्प होणार आहे.
21 एप्रिल रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये समर कॅम्प मधील मुलांना सहभागी होता येणार आहे. तर 22 मे रोजी मुलांनी बनवलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी 7769989378 व 9765646116 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.