सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते -अभिजीत खोसे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तेत राहिल्यास समाजातील कामे करता येतात. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतात. सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते. याच भावनेने अजित पवार जनतेच्या हितासाठी सत्तेत गेल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी केले.
राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी अभिजीत खोसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उद्योग व व्यापार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे, श्री विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त तथा शहर बँकेचे संचालक अशोक कानडे व मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक विजय कोथंबिरे यांनी केला. यावेळी खोसे बोलत होते. याप्रसंगी महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, अशोक गुंजाळ, खलील सय्यद, इकबाल शहा, आशुतोष पानमळकर, दिपाली आढाव, साधना बोरुडे, गजेंद्र दांगट, प्रकाश रासकर, नंदनसिंह परदेशी, पवन दिंडोकार, राम धोत्रे, नितीन गारदे, प्रशांत ढलपे, जैनुद्दीन रामपूरवाला आदी उपस्थित होते.
पुढे खोसे म्हणाले की, राजकीय पक्षात कार्य करताना मोठा मित्र परिवार जोडला गेला आहे. निस्वार्थ भावनेने कार्य केल्यास आपल्या अडचणीच्या काळातही लोक धावून येतात. राष्ट्रवादीतून काढून टाकल्यानंतर पुन्हा 24 तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नव्याने पद मिळाले. हे केलेल्या कामाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

अनंत गारदे म्हणाले की, राजकारणाबरोबर समविचारी लोक एकत्र आणण्यासाठी अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. राजकारण व समाजकारण मध्ये कार्य करताना मोठा मित्र परिवार जोडला गेला असून, त्यांच्या यशामुळे अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक कानडे म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या सत्काराने जबाबदारी वाढून आनखी कार्य करण्याची ऊर्जा मिळते. मित्रपरिवार विविध कारणांनी एकत्र येत असल्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. रेश्मा आठरे यांनी विविध क्षेत्रात झालेल्या व्यक्तींची नियुक्ती ही त्यांनी केलेल्या कार्याची पावती असल्याचे सांगितले.
अशोक गुंजाळ म्हणाले की, समविचारी व्यक्ती एकत्र आल्यास मोठे विधायक काम मार्गी लागणार आहे. विविध पक्ष व राजकीय संघटनात कार्यरत असलेली व्यक्ती एकत्र येत असताना, त्याला दिशा मिळण्याची गरज आहे. समविचारी व्यक्तींच्या विचारातून शहराच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले. आभार नितीन गारदे यांनी मानले.