• Wed. Oct 15th, 2025

माळी महासंघाची जिल्हा व भिंगार शहर कार्यकारणी जाहीर

ByMirror

Jul 24, 2023

राम पानमळकर यांची सहकार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

समाजामुळे व्यक्तीला किंमत -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- माळी महासंघाची जिल्हा व भिंगार शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तर नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर यांची संघटनेच्या सहकार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा माळी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


माळी महासंघाचे राष्ट्रीय अधक्ष आविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नूतन पदाधिकारी यांचा समाजातील ज्येष्ठ नेते भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, प्रा. माणिक विधाते व बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यावेळी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, जेष्ठ नागरिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गोंधळे, शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाने, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. सुनिल तोडकर, जिल्हा उपाध्यक्ष तुषार फुलारी आदी उपस्थित होते.


राम पानमळकर म्हणाले की, सामाजिक चळवळीत काम करताना शेवटच्या घटकांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले. गरजूंना अडचणीच्या काळात मदत केली. सामाजिक व राजकीय कार्य निस्वार्थपणे करत असताना मोठा समाजवर्ग जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या कामापासून चळवळीची सुरुवात होत असते. तर सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवत गेल्यास ही चळवळ व्यापक बनत असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाजामुळे व्यक्तीला किंमत आहे. यामुळे समाजाचे नेतृत्व करताना समाजाच्या कल्याण व विकासात्मक दृष्टीने योगदान देण्याची गरज आहे. समाजासाठी निस्वार्थपणे योगदान दिल्यास समाज देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माळी महासंघाचे सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.


जिल्हाध्यक्ष गणेश बनकर म्हणाले की, नुतन पदाधिकारी यांच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवाचा समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी फायदा होणार आहे. समाजात विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना एकत्र जोडून समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी माळी महासंघ योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.


भिंगार शहर कार्यकारणीवर शहराध्यक्षपदी विठ्ठल दळवी, उपाध्यक्षपदी भुषण भुजबळ, खजिनदारपदी रविंद्र शिंदे, कर्मचारी महिला आघाडी शहर उपाध्यक्षपदी मोहिनीताई बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. आकाश महाराज फुले, सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी संदीप दळवी, कर्मचारी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उषाताई चौरे, सहकार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पांढरे यांची निवड झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *