• Fri. Feb 20th, 2026

मच्छिंद्र ओव्हाळ यांना भारत सरकारचा पुरस्कार

ByMirror

Dec 27, 2022

भारत भूषण पुरस्काराने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मनिर्भर भारत व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार आणि निती आयोग यांच्या माध्यमातून दिला जाणारा मानाचा भारत भूषण पुरस्कार नुकताच न्यू इंग्लिश स्कूल माण विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. मच्छिंद्र ओव्हाळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ.जे.के. सुब्रमण्यम, डायरेक्टर एन.ए.एच.एफ. डॉ. एल्ल.एम. डोग्रा, बॉलीवूड स्टार आनंद बक्षी आदी उपस्थित होते.


भोपाळ येथे भारतीय लष्कराचे जनरल मेजर तेजपाल सिंग रावत यांच्या हस्ते डॉ. ओव्हाळ यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. ओव्हाळ यांचे शिक्षण, क्रीडा तसेच संघटनात्मक पातळीवर असलेले कार्य पाहता त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली.

नुकताच त्यांना आशिया खंडाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कार्याची दखल भारत सरकार निती आयोग व आत्मनिर्भर भारत यांनी घेऊन त्यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान केला.

संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले, केंद्रीय क्रीडा मंत्री नामदार अनुरागसिंग ठाकूर, युवा सेनेचे अविनाशभाऊ बलकवडे, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, राजेंद्र ओव्हाळ, मुख्याध्यापक अंबादास रोडे, माण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक नेते विजय अण्णा भोसले व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *