वृक्षरोपण आणि स्वच्छता अभियानाने अभिवादन
हरदिन मॉर्निग ग्रुपचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निग ग्रुपच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती स्वच्छता अभियान आणि वृक्षरोपणाने साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क येथे हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रारंभी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. ग्रुपचे सक्रीय सदस्य अमोल धाडगे, किशोर सोमाणी व जालिंदर बोंदर्डे यांच्या हस्ते झाडे लाऊन वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. तर ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण जॉगिंग पार्क परिसराची स्वच्छता केली.
या अभियानात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, दीपक बडदे, सुंदरराव पाटील, दिलीप गुगळे, सर्वेश सपकाळ, सीए रविंद्र कटारिया, केशवराव दवणे, विकास भिंगारदिवे, मुन्ना वाघस्कर, अभिजीत सपकाळ, नामदेव जावळे, सुधाकर चिदंबर, अशोक पराते, दिलीप ठोकळ, सरदारसिंग परदेशी, बाबासाहेब बेरड, रामनाथ गर्जे, जालिंदर अळकुटे, अजय खंडागळे, अब्बास शेख, राजू कांबळे, संतोष लुनिया, तुषार धाडगे, अशोकराव भुजबळ, सुमेश केदारे, अनंत सदलापूर, सुधीर तेलंगे, कुमार धतुरे, राजू शेख, भाऊसाहेब कराळे, राजेंद्र अकोलकर, सुहास देवराईकर सहभागी झाले होते.

संजय सपकाळ म्हणाले की, सत्य व अहिंसेच्या मार्गाने जग जिंकता येते, हे महात्मा गांधीच्या कार्यातून सिध्द झाले.इतरांसाठी जगणारी माणसे अजरामर ठरतात. स्वतंत्र्य भारताच्या जडणघडणीमध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. स्वातंत्र्य भारतात पर्यावरणाच्या प्रश्नाशी लढा देण्याची गरज आहे. पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्षरोपण एकमेव पर्याय असून, प्रत्येकाने देशसेवेच्या भावनेने या चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी सांगितले. तर सार्वजनिक स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची असून, साथीच्या आजारांना टाळण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. तर आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात योगदान देणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपची त्यांनी माहिती दिली.
