• Wed. Oct 15th, 2025

बेरोजगार युवकांना उद्योग व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

ByMirror

Jul 24, 2023

युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

ई टेंडरिंग, जेम पोर्टल, ई सेवा, पशुसंवर्धन व डिजिटल मार्केटिंगचे दिले जाणार प्रशिक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील आयटी पार्क, सारस्वत बँक शेजारी होणाऱ्या या प्रशिक्षणार्थींना उद्योग गुरु रविराज भालेराव मार्गदर्शन करणार आहे.


या प्रशिक्षण वर्गात ई टेंडरिंग, जेम पोर्टल प्रशिक्षण, ई सेवा ट्रेनिंग, ग्रामीण भागातील मुलांसाठी पशुसंवर्धन आधारित ऑनलाईन शेळी, कुक्कट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण व डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ई-निविदा प्रक्रिया ओळख, ई-निविदा प्रक्रिया पद्धती, शासनाचे ई-टेंडरिंगचे मार्गदर्शक तत्त्वे, डिजिटल स्वाक्षरी म्हणजे काय, डिजिटल स्वाक्षरीसाठी अर्ज कसा करायचा, पीएसयू, सीपीएसयू आणि सरकारच्या आवश्‍यकतांचे मूल्यांकन कसे करावयाचे, कंपनी नोंदणी प्रक्रिया, ई-निविदा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, दस्तऐवजीकरणाचा लाइव्ह प्रात्याशिक, त्यासोबत जेम पोर्टल, पोर्टलवर आपली फर्म कशी नोंदणी करावी, जेम पोर्टलवर प्रात्यक्षिक, जीएसटी आणि त्याचा परिचय, जीएसटी नोंदणी प्रक्रिया, एमएसएमई ग्लोबल मार्ट बद्दल माहिती तसेच नव उद्योजकासाठी विविध शासकीय, अशासकीय योजना, कर्ज व सबसिडी योजनेबाबत तज्ञ व्यक्ती व शासकीय अधिकारी माहिती देणार आहे.


या प्रशिक्षण वर्गात 18 ते 50 वयो गटातील महिला पुरुषांना सहभागी होता येणार आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता पाचवी ते पदवीधारक असून, या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी 9960599985 व 7798555502 या नंबर वर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *