किर्तनासाठी पहिल्याच दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उत्स्फूर्त हजेरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ भक्तीमय वातावरणात झाला. संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सुरु झालेल्या सप्ताहाचा प्रारंभ ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई धाडगे (कापुरवाडी) यांच्या किर्तनाने झाले. तर दुसर्या दिवशी ह.भ.प. मनोहर महाराज शिनारे (राहुरी) यांचे किर्तन रंगले होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धार्मिक सोहळ्याला पहिल्या दिवसापासूनच भाविकांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या सप्ताहाचे हे 14 वे वर्ष असून, आठ दिवस गावात हा भक्तीमय सोहळा रंगणार आहे. वैकुंठवासी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) यांच्या आशिर्वादाने तर गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे.
या सोहळ्यात ह.भ.प. हरी महाराज भोंदे, माऊली महाराज मोकाशे, दामोधर महाराज धोंर्डे, विठ्ठल महाराज खळदकर, डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ यांचे किर्तन होणार आहे. तर 19 मे रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, लक्ष्मण चौरे, भाऊसाहेब आनंदकर, बबन जाधव, चंद्रभान जाधव, सुभाष खळदकर, मच्छिंद्र जाधव, बन्सी जाधव, रामदास जाधव, भास्कर उधार, संजय पुंड, भाऊसाहेब जाधव आदींसह निमगाव वाघा ग्रामस्थ व भजनी मंडळ परिश्रम घेत आहे.