• Fri. Mar 27th, 2026

दसरे नगरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

ByMirror

Mar 26, 2026

महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती


स्वराज प्रतिष्ठानचा भक्तिमय सोहळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील दसरे नगर परिसरात स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (दि. 26 मार्च) श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित महिला भाविकांनी भगवान श्रीराम जन्माचा पाळणा हलविला.


कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी राम परिसर रामनामाच्या गजराने, भजन-कीर्तन, आरती आणि धार्मिक वातावरणाने भारावून गेला होता. उपस्थित भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद लुटला. या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, नगरसेविका रोशनीताई त्र्यंबके, रूपालीताई वारे, संध्याताई पवार यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी किशोर वाणी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये बाळकृष्ण नरवडे, भाऊसाहेब आव्हाड, अजित शहाणे, महादेव साबळे, वासुदेव आव्हाड, सारंग शहाणे, तुकाराम मिसाळ, राजू गीते, योगेश जावळे, मयूर सूर्य पुजारी तसेच शेखर बनकर यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राम जन्माच्या पवित्र क्षणी आरती करण्यात आली व त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. स्वराज प्रतिष्ठानच्या या उपक्रमाद्वारे संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *