• Wed. Oct 15th, 2025

जय हिंद फाऊंडेशनने केला कारगिल विजय दिवस वृक्षरोपणाने साजरा

ByMirror

Jul 26, 2023

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परिसरात 211 झाडांची लागवड

देश रक्षणासह पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्यासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी -सुहास मापारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने कारगिल विजय दिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात 211 झाडांची लागवड केली.


अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षा अर्चना नागरे व कोल्हारचे ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ उल्हारे, संजय पाटेकर, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, बाबासाहेब घुले, सैनिक समाज पार्टीचे ॲड. शिवाजी डमाळे, ॲड. राजेंद्र सोमवंशी, पोपट गिते, सुनिल गुंजाळ, भाऊसाहेब पालवे, अमोल वारे, त्रिदल संघटनेचे अशोक चौधरी, भाऊसाहेब पालवे, संदिप घुले, नवनाथ वारे, एकनाथ माने, आव्हाड मेजर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चित्रसेन गडांकुश, आबासाहेब पवार, राजेंद्र सांगळे, वस्तीगृह अधीक्षक अशोक वाघ, वरिष्ठ लिपिक अंकुश हंडे, दादाभाऊ पठारे, ज्ञानदेव गुंजाळ, वीर पत्नी स्वाती कावरे, मीनाक्षी राजभोसले, पुष्पाताई लोमटे, सुवर्णा घोडे, फरीजान शेख, प्रतिभा वामन, विद्या काळे आदींसह माजी सैनिक, शहीद परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले की, देश रक्षणासह पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्यासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षरोपण चळवळीची क्रांती घडत आहे. कारगिल विजय दिवसचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिक देत असलेले योगदान अभिमानास्पद आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आजी-माजी सैनिकांच्या असणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. आभार सहाय्यक कल्याण अधिकारी चित्रसेन गडांकुश यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *