वादविवाद स्पर्धेस शहरातील 18 शाळांचा सहभाग
भाऊसाहेबफिरोदिया हायस्कूलने पटकाविला सांघिक करंडक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या वाद-विवाद स्पर्धेने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वादविवाद स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत सांघिक करंडक भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने पटकाविला.
संस्थेचे सदस्य अॅड. गौरव मिरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेची सुरुवात झाली. प्रारंभी अशोकभाऊ फिरोदिया व शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून डॉ. सुनिता मोटे व प्रा. सारिका परदेशी उपस्थित होत्या.
रेणुका पुरंदरे यांच्यासह शालेय विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक प्रभाकर भाबड यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. सुनिता मोटे यांनी भारत हा विविधतेने नटलेला असून, राष्ट्रभाषा हिंदीने सर्व भारतीय एकमेकांना जोडले गेलेले आहे. देशात अनेक भाषा असल्यातरी विचारांची देवाण-घेवाण हिंदीतून सहज शक्य होत असल्याचे स्पष्ट करुन हिंदीचे महत्त्व विशद केले.
या वाद-विवाद स्पर्धा स्पर्धेस 18 विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध विषयावर हिंदीतून आपले विचार मांडले. या स्पर्धेत प्रथम- चैतन्य रावसाहेब गर्जे (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), द्वितीय- निधी शिवचरण गुप्ता (सिक्रेटहार्ड कॉन्व्हेंट), तृतीय- सिद्धी प्रमोद मते (अशोकभाऊ फिरोदिया), उत्तेजनार्थ- श्रुती साहेबराव गोपड (जय बजरंग विद्यालय), कृष्णा संजय बेलेकर (श्रीराम कृष्ण स्कूल) यांनी बक्षिसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी व सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. दोन सत्रात सदर कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम सत्रात रुपाली काळे मॅडम, संगिता वंगा तर द्वितीय सत्रात आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

