स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय होत असल्यास संघटना त्यांच्या मागे उभी राहणार -कळकुंबे
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची फेरनियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.सी. कटारिया (दिल्ली) व विजय गुप्ता (पुणे) यांच्या हस्ते कळकुंबे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
नुकतेच सोलापूर या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात एक दिवसाचे धरणे आंदोलन झाले. यावेळी झालेल्या बैठकित कळकुंबे यांची अहमदनगर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी फेरनियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील पेंटर, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार राजु शिनगारे, लालाभाई, बाबा शेख, सागर बोडखे, विठ्ठल झारगड, नारायण पाखरे, पोपट पाखरे, देविदास पाखरे, आबा साळवे, संजय मारकड, सुधा निकम, माऊली निमसे, आंबदास खंडागळे, राहूल बारस्कार, मतीन शेख, रामकीसन फुंदे, देविदास बटुले, प्रफुल्ल महाजन आदी उपस्थित होते.
मीनाताई कळकुंबे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात उत्तमपणे संघटनेचे कार्य सुरु असून, त्यांनी वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करुन स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. तर वेळप्रसंगी आंदोलन व उपोषण देखील केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची फेरनियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.सी. कटारिया यांनी स्पष्ट केले. मीनाताई कळकुंबे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय होत असल्यास संघटना त्यांच्या मागे उभी राहणार असून, अनेक प्रश्न हाताळून संघटनेला यश देखील आले असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दलस्वस्त धान्य दुकानदार विजय गायकवाड (श्रीगोंदा), मोहिते (पाथर्डी), सुरेश उमेदळ, राजेश काकडे (नगर), सांगळे ताई, माणिक जाधव (श्रीरामपूर) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.