जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत नऊवा क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, समर्थ विद्या प्रशालेचा (सावेडी) विद्यार्थी श्लोक विकास ढोकळे यांने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत तो जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत नऊवा तर राज्यात 31 वा क्रमांक पटकाविला आहे.
श्लोक हा शहरातील विधीज्ञ अॅड. विकास अण्णा ढोकळे व चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका वर्षा ढोकळे यांचा सुपुत्र आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक शाला अंतर्गत व बाह्य विविध स्पर्धांमध्ये त्याने यश संपादन केले आहे. त्याला समर्थ विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक कासार, वर्गशिक्षक पारधे व सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.