अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या एस.टी. बँकेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय खेडकर व संध्या दहिफळे यांचासत्कार सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केला.
शहरातील माळीवाडा येथील एस.टी. बँकेत अहमदनगर शाखेचे शाखा व्यवस्थापक आदिनाथ कुलट व श्रीरामपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पाडला. यावेळी प्रकाश गावडे, निलेश चांदणे, सुभाष खेडकर, विशाल जोगदंड, राजेंद्र घुगे, कैलास धोत्रे, विजय जाधव, बापू गर्जे, दत्ता येणारे, सुनिल कर्नावट, किरण गारुडकर, संदीप बडे आदींसह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय खेडकर व संध्या दहिफळे यांनी सभासदांना केंद्र बिंदू ठेऊन त्यांचे हित जोपासून कार्य केले जाणार असल्याची भावना व्यक्त केली.