45 हजार पासून ते 93 हजार पर्यंत मिळणार सूट
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्राहकांचा विश्वास संपादन करुन विविध गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या विविध वाहनांच्या मॉडेल्सवर केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुमच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. टोयोटाच्या विविध कारच्या मॉडेल्सवर 45 हजार पासून ते 93 हजार पर्यंत सूट दिली जाणार असल्याची माहिती शोरुमचे जनक आहुजा व अनिश आहुजा यांनी दिली.
ग्राहकांना सेवा पश्चात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या वासन टोयोटा शोरुमच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव, दिवाळी व पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सुट देण्यात येते. या गणेशोत्सवात अर्बन क्रुजर टाइसर, टोयोटा रुमीऑन, टोयोटा ग्लांझा आणि अर्बन क्रुजर हायराइडर या कार मॉडेल्सवर अनुक्रमे 70, 45, 93 व 89 हजार पर्यंत सुट जाहीर करण्यात आली आहे.
टोयोटा किर्लोस्कर कंपनीने ग्राहकांच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता दर्जेदार कार उत्पादने बाजारात आनले आहेत. कमी किंमतीत उच्च दर्जाचे वाहन ग्राहकांना टोयोटाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. मजबूत आणि संपूर्ण श्रेणीतील विविध गुणवैशिष्टयेचा समावेश असलेल्या कारच्या श्रेणीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
टोयोटाच्या सदर वाहनांच्या मॉडेल्सवर आकर्षक सवलतीचा लाभ वासन टोयोटाच्या अहमदनगर, संगमनेर व श्रीगोंदा येथील शोरूममध्ये भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9604038234 व 9852512344 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.