गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या युवक-युवती व समाजबांधवांचा होणार गौरव
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा विशेष सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 25 ऑगस्ट) चर्मकारांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सर्व चर्मकार समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे गुणगौरव सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. मागील दहा वर्षापासून चर्मकार विकास संघाच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करुन, प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसह विशेष यश प्राप्त करणाऱ्या युवक-युवती व समाजबांधवांचा सन्मान केला जातो.
या सोहळ्यात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या युवक-युवती व समाजबांधवांचा गुणगौरव केला जाणार आहे. तर शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा विशेष सन्मान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.