• Tue. Sep 10th, 2024

श्रीलता आडेप यांनी स्विकारली इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे

ByMirror

Sep 5, 2024

पदग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्याचा जागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या पदग्रहण सोहळा सामाजिक कार्याचा जागर करुन पार पडला. यावेळी माजी अध्यक्षा श्रीलता आडेप यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर खजिनदार शुभांगी देशमुख, आयएसओ जयश्री गायकवाड, संपादक कोमल वधवा यांनी देखील पदाची सूत्रे स्विकारली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सायली खान्देशी, डॉ. सोनाली वहाडणे, सारिका मुथा, अर्पिता शिंगवी, कल्पना गांधी, स्वाती गांधी, मौसमी गुरवे आदी उपस्थित होते.


प्रारंभी इनरव्हीलची प्रार्थना घेऊन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीलता आडेप यांनी मागील वर्षी राबविण्यात आलेले कॅन्सर जनजागृती उपक्रम, गरजू विद्यार्थी व शाळांना शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरांसह सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उपक्रमाच्या आढावा घेतला.


सायली खान्देशी यांनी श्रीलता आडेप यांनी उत्तमप्रकारे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा एक वर्षासाठी अध्यक्षपदाची सोपविण्यात आलेली जबाबदारी अभिनंदनास्पद असल्याचे सांगितले. मागील वर्षी 103 सामाजिक उपक्रम राबवून विविध अवॉर्ड मिळवल्याबद्दल आडेप यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला.


श्रीलता आडेप म्हणाल्या की, समाजाची गरज ओळखून इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनस योगदान देत आहे. विविध क्षेत्रातील महिलांना एकत्रित करून ही सामाजिक चळवळ सुरू आहे. सामाजिक कार्यात महिला योगदान देवून शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहचविण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांना विविध पदाची सूत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या पदग्रहण सोहळ्यासाठी क्लबचे महिला सदस्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *