• Mon. Dec 9th, 2024

दिल्लीगेट येथे श्री रामाज्‌ प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा शुभारंभ

ByMirror

Aug 25, 2024

श्री रामाज्‌ प्युअर व्हेजची स्वाद व दर्जेदार खाद्य सेवा नगरकरांच्या पसंतीस उतरेल -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामाज्‌ प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या माध्यमातून दिल्लीगेट परिसरात नगरकरांसह शिक्षणासाठी शहरात आलेल्या महाविद्यालयीन युवक-युवतींना दर्जेदार खाद्य पदार्थ उपलब्ध होणार आहे. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत नाश्‍त्यासाठी असलेले स्वादिष्ट खाद्य पदार्थ खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. मागील 43 वर्षापासून हॉटेल व्यवसायत असलेल्या पवार कुटुंबीयांनी नव्याने सुरु केलेल्या या रेस्टॉरंटचा स्वाद व दर्जेदार खाद्य सेवा नगरकरांच्या पसंतीस उतरेल असा विश्‍वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.


शहरातील दिल्लीगेट शनि मारुती मंदिर शेजारी नव्याने सुरु झालेल्या श्री रामाज्‌ प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या शुभारंभ प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी उद्योजक सचिन (आबा) कोतकर, रमेश भाऊ रासणे, संचालक अजय पवार, प्रिया पवार, प्रताप पवार, हेमंत पवार, रोहित सातपुते, ज्ञानेश्‍वर विंचुरकर आदींसह पवार कुटुंबीय उपस्थित होते.


सचिन (आबा) कोतकर यांनी दर्जा व उत्तम सेवा दिल्यास हॉटेल व्यवसायात यश मिळत असल्याचे स्पष्ट करुन शुभेच्छा दिल्या. श्री रामाज्‌ प्युअर व्हेजच्या माध्यमातून राईस प्लेटसह, नाश्‍त्याचे विविध खाद्य, उपवासाचे पदार्थ, पाणीपुरी चाट, साऊथ इंडियन व फास्टफुडचे स्वादिष्ट खाद्य पदार्थ मिळणार आहे. 1981 पासून पवार कुटुंबीय हॉटेल व्यवसायात आहे. पुन्हा नव्याने हा व्यवसाय उभा करण्यात आला असल्याची माहिती अजय पवार यांनी दिली.