फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
मुलींमध्ये आठरे पाटील व आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम फेरीत धडक
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.02 ऑक्टोबर) मुला-मुलींच्या गटातील उपान्त्य फेरीचे सामने रंगणार आहेत. लीग सामन्यातून प्रवरा पब्लिक, तक्षिला, आठरे पाटील, आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस), सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट, रामराव आदिक व डॉन बॉस्कोच्या विविध गटातील संघांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला असून, हे सामने नॉकआऊट पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. 17 वर्षा आतील मुलींच्या संघात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) यांच्यात अंतिम सामन्यात धडक मारली आहे. सर्व गटातील अंतिम सामने शनिवारी (दि.5 ऑक्टोबर) होणार आहे.
उपान्त्य फेरीत 12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द तक्षिला स्कूल, आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस).
14 वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुध्द तक्षिला स्कूल.
16 वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द रामराव आदिक स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुध्द डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात सामने होणार आहे. यामधील विजते संघ फायनल मध्ये खेळणार आहे.
शनिवारी अंतिम सामन्याप्रसंगी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर बालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेचा समारोप आगळ्या-वेगळ्या पध्दतीने व विविध उपक्रमांनी होणार असून, पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.