• Tue. Sep 10th, 2024

एससी एसटी ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचा डिव्हिजन कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात

ByMirror

Sep 5, 2024

पोस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार -जयराम जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी)- एससी एसटी ओबीसी वेल्फेअर असोसिएशन अहमदनगरचा डिव्हिजन कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात आलेल्या पोस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.


महाराष्ट्र राज्य व गोवा राज्याचे सर्कल सेक्रेटरी जयराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यासाठी रिजनल सेक्रेटरी अमोल साळवे, प्रकाशजी कदम, पिराजी सदावर्ते, शिलवंत, प्रविण शिंदे, किरण शिंदे, दिपक नागपूरे, अमोल साबळे, प्रदिप सुर्यवंशी, महेश सदाफुले, महेश तामटे, विधाते, विजय चाबुकस्वार, शैलेश राहिले आदींसह जिल्ह्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रीगोंदा येथील पडण्यास आलेली इमारत, महिलांसाठी स्वच्छतागृहाच्या प्रश्‍नावर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. सभासदांच्या मुलांना मिळणारी शैक्षणिक फी शाळा सुरु होण्याच्या प्रारंभी मिळावी व मेडिकल बिल लवकरात लवकर मिळण्याच्या समस्या मांडण्यात आल्या.


जयराम जाधव म्हणाले की, एसएसपीएसएसपी ऑफिस झोपेचे सोंग घेत असल्याने या विभागातील प्रश्‍न गंभीर बनत चालले आहे. त्यांना जागे करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. गेंड्याची कातडी परिधान करून ते गरिब असल्याचा आव आणत आहे. मात्र संघटनेच्या माध्यमातून हे ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले. तर तर संघटना एससी एसटी ओबीसी पुरती मर्यादीत नसून, सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक सतीश येवले यांनी केले. आभार असोसिएशनचे सेक्रेटरी विजय चाबुकस्वार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *