पार्वती प्रतिष्ठानचा उपक्रम
स्वामी कुटुंबाचे सामाजिक कार्य प्रेरणादायी -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवानिमित्त पहिल्याच दिवसापासून भिंगार येथील सैनिक नगरचा राजा गणेश मंडळ येथे पार्वती प्रतिष्ठानच्या वतीने सलग दहा दिवस भाविक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आयोजित भंडाऱ्याचा शुभारंभ हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व सामाजिक कार्यकर्ते लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते झाले. मागील 12 वर्षापासून स्वामी परिवाराच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त सलग दहा दिवस भंडाऱ्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रारंभी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करुन आरती करण्यात आली. यावेळी रोहन स्वामी, विक्टर स्वामी, कॅप्टन थापा, क्लिनीट स्वामी, स्वप्निल गांधी, वामन पगारे, सुधा साळवे, अतुल बनसोडे, किरण बागडी, वाहिद शेख, पंकज गवळी, प्रफुल्ल थापा, जहीर सय्यद, निलोफर शेख, कमल जाधव, मनीषा चंडाले, मीना बेग, आशा चव्हाण, प्रतिज्ञा चव्हाण, कांबळेबाई आदींसह भाविक उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, आपल्या आईच्या नावाने सुरु केलेल्या पार्वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून लॉरेन्स स्वामी सामाजिक योगदान देत आहे. स्वामी परिवार धार्मिक व सामाजिक कार्याशी जोडले गेलेले असून, समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम करत आहे. गणेशोत्सवात सलग दहा दिवस सुरु असलेल्या भंडाऱ्याचा लाभ भाविकांना होत आहे. स्वामी कुटुंबातील प्रत्येक सदस्य सामाजिक वारसा जपत असून, त्यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉरेन्स स्वामी यांनी आईच्या प्रेरणेने धार्मिक व सामाजिक कार्य सुरु आहे. समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच पुढाकार राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.