हवालदार सर यांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यासू प्रवृत्ती साखर कारखान्यासाठी उपयुक्त ठरणार -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रमजान हवालदार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व चेअरमन राजेंद्र नागवडे यांचा शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे व जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे सत्कार केला. यावेळी वैभव सांगळे, काकडे, पोपट नागवडे, प्रा. आप्पासाहेब काकडे आदी उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले रमजान हवालदार यांची साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी लागलेली वर्णी शिक्षकांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. हवालदार सर यांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यासू प्रवृत्ती साखर कारखान्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महेंद्र हिंगे यांनी शिक्षक असलेले हवालदार यांना राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक क्षेत्राशी देखील ते जोडले गेले आहेत. त्यांच्या माध्यमातून कारखान्याची भरभराट होणार असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना रमजान हवालदार यांनी मिळालेला हा बहुमान सर्व शिक्षक-शिक्षकेतरांचा असल्याचे सांगितले.