सार्वजनिक स्वच्छता सदृढ आरोग्याची नांदी ठरणार -ॲड. पुष्पा जेजुरकर
नगर (प्रतिनिधी)- जीवन आधार प्रतिष्ठानच्या वतीने माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र) यांच्या निर्देशानुसार चंदनापुरी घाटातील (ता. संगमनेर) चंदनापुरी शाळा परिसर व नागरी वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात संस्थेचे प्रतिनिधी व महिला सहभागी झाल्या होत्या.
या अभियानाप्रसंगी संस्थेच्या ॲड. पुष्पा जेजुरकर, गोरख गफले, सुरेखा जाधव, हिराबाई गफले, सिद्धार्थ जाधव, छाया गोफणे, सुमन जाधव, पुंजाबाई भंडकर, संगीता गोफणे, विठाबाई शिरतार, सुनंदा शिरतार, शितल गफले, कुसुमबाई बोऱ्हाडे, आदिनाथ चव्हाण, लक्ष्मण गोफणे, सविता जेडगुले, विद्या गोफणे, संगीता जाधव, सुभाष जेजुरकर आदी उपस्थित होते.
ॲड. पुष्पा जेजुरकर म्हणाल्या की, निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावा-गावात स्वच्छता निर्माण होणे गरजेची आहे. सार्वजनिक स्वच्छता सदृढ आरोग्याची नांदी ठरणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्याचे दुष्परिणाम साथीच्या आजारातून दिसत आहे. स्वच्छतेवर निरोगी आरोग्य विसंबून असून, मनुष्य स्वच्छतेचे भान विसरल्याने रोगराईला बळी पडत आहे. भावी पिढीत व नागरिकांमध्ये स्वच्छतेचे मुल्य रुजविल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, सुनील धारुडकर, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.