आमदार जगताप यांच्या वतीने करण्यात आला सत्कार
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने मंगळवारी (दि.1 ऑक्टोबर) भिंगार येथील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
भिंगार ज्येष्ठ नागरीक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यामध्ये श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त तथा शहर बँकेचे संचालक प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे, उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे, सचिव सुभाष होडगे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर सभेला उपस्थित असलेले 250 सभासदांचा गुलाबपुष्प देऊन त्यांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सोशल मीडियाचे शहराध्यक्ष मारुती पवार, मंगेश (गुड्डू) खताळ, दिपक लिपाने, ओमकार फिरोदे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने भावी पिढी भविष्यातील वाटचाल करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अडगळ न समजता त्यांचे पूजन करणारे कुटुंबीय प्रगतीपथावर आहे. त्यांच्या सकारात्मक विचाराने युवकांना योग्य दिशा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा झालेला सत्कार हा प्रत्येकाचा सन्मान वाढविणारा आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छाबद्दल त्यांनी आभार मानले.