• Fri. Oct 11th, 2024

भारतीय जन संसदची शहर कार्यकारिणी जाहीर

ByMirror

Oct 1, 2024

शहराध्यक्षपदी रईस शेख यांची नियुक्ती

बकाल आणि असुरक्षित खेडे ही शहराची बिरुदावली बदलण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -अशोक सब्बन

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक शहराचे बकाल आणि असुरक्षित खेडे ही बिरुदावली बदलून शाश्‍वत विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. नगरकरांनी सुज्ञ नागरिकांप्रमाणे जबाबदारी पार पडल्यास शहराचा विकासात्मक कायापालट होणार असल्याची भावना भारतीय जन संसदचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन यांनी व्यक्त केली.


भारतीय जनसंसदच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शहरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात सब्बन बोलत होते. कोर्ट गल्ली येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शहराध्यक्षपदी रईस शेख, उपाध्यक्षपदी राम धोत्रे, सचिवपदी अभियंता जयेश देवळालीकर, सहसचिवपदी शिरीष पापडेजा तर खजिनदारपदी वीरबहादूर प्रजापती यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


पुढे सब्बन म्हणाले की, पूर्वी ऐतिहासिक शहराची किर्ती जगभर गाजत होती. आज शहराचे बकालीकरण झाले असून, सर्वसामन्य जनतेला निर्भय, स्वतंत्रपणे वावरता व अभिव्यक्त होता येत नाही. शहरातील नागरी, सेवा-सुविधाचा बोजवारा तर उडलाच आहे, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न पण गंभीर बनत चालला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरु असून, त्याला जनआंदोलनाने बदल घडवावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे म्हणाले की, या सर्व प्रश्‍नावर लक्ष केंद्रित करून शहरातील शांतता प्रेमी, सकारात्मक शाश्‍वत विकासाची भूमिका घेणाऱ्या नागरिकांचे संघटन करावे लागणार आहे. शहराचा पर्यावरणपूरक असे महिला व मुलांना सुरक्षित, पायाभूत सुविधायुक्त, जलसमृध्द, आरोग्यपूर्ण स्वच्छ व हरित शहर लोक सहभागातून विकासित करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.


या बैठकीसाठी एम. इकबाल, अशोक औशीकर, विठ्ठल सुरम, सुनील टाक, विजय शिरसाठ, अशोक दळवी, अशोक ढगे, बबलु खोसला, अशोक भोसले, केशव बरकते, अशोक डाके, प्रकाश गोसावी, सुभाष शिदे, जसवतसिंग परदेशी आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार कैलास पठारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *