पिडीत महिलेला मुलांसह भाड्याच्या घरात राहाण्याची आली वेळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- पतीच्या निधनानंतर ननंद व तिच्या पतीने राहत्या घराचा खोट्या कागदपत्राद्वारे व्यवहार करून फसवणुक केल्याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी पिडीत महिला रिना कौसर सारसर हिने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
रीना सारसर या नालेगाव म्युनिसिपल कॉलनीत दोन मुली सोबत राहत आहे. नवऱ्याचे निधन झाल्याने एकटी असल्याचा फायदा घेऊन मोठी ननंद आणि तिच्या पतीने संगनमत करून जावेच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन फसवणूक केली आहे. नालेगाव म्युनिसिपल कॉलनीतील राहते घर न विचारता परस्पर व्यवहार करुन खोट्या कागदपत्र तयार करुन फसवणुक केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
राहत्या घरातून फसवणूक करून हाकलून लावल्यामुळे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. घराचे खोटे कागदपत्र तयार करून संबंधितांनी धमकी दिली असून, त्यांच्यापासून जीविताला देखील धोका निर्माण झाला असल्याचा आरोप रीना सारसर यांनी केला आहे.