रविवारी प्रोफेसर चौकातून अभियानाची सुरुवात
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकारच्या हर घर तिरंगा अभियानात जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन सहभागी होणार आहेत. शहरात रविवारी (दि.7 ऑगस्ट) या अभियानाच्या जनजागृती मोहिमेची सुरुवात होत असून, या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकार्यांना रोप भेट देऊन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.
प्रोफेसर चौक येथून जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशनच्या महिला सदस्या जनजागृती अभियान सुरु करणार आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना हर घर तिरंगा अभियानात सहभागी करुन घेतले जाणार आहे. या जनजागृती कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांना देण्यात आले. यावेळी अनिताताई काळे, मिनाक्षी जाधव, माया हराळ आदी उपस्थित होत्या.