• Wed. Dec 11th, 2024

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारच्या ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान

ByMirror

Sep 5, 2022

शिक्षक दिनाचा उपक्रम

राष्ट्र निर्माणाचे कार्य शिक्षक करतात -संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात पोपट नगरे, एकनाथराव जगताप, शरद बरबरे, सचिन काळे, किसनराव मेहेर, भगवानराव पालवे या शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला.


या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मेजर दिलीपराव ठोकळ, सुभाष गोंधळे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दीपक घोडके, दिलीप गुगळे, माजीद शेख, अभिजीत सपकाळ, अशोक पराते, सुधाकर चिदंबर, शेषराव पालवे, विश्‍वास वाघस्कर, केशवराव दवणे, विठ्ठल राहिंज, विकास निमसे, अविनाश जाधव, रामनाथ गर्जे, जालिंदर अळकुटे, राजू कांबळे, महेश सरोदे, कुमार धतुरे, नितीन कदम, विजय यादव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, राष्ट्र निर्माणाचे कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्यामुळे सुजान पिढी घडत आहे. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवितात. शिक्षकांच्या संस्कारामुळे समाज सावरला असून, गुरुशिवाय जीवन व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षकांनी घडविलेले भिंगार मधील अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवीत असल्याचे स्पष्ट केले. मेजर दिलीप ठोकळ यांनी शिक्षक दिनी सर्व ज्येष्ठ शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षकांनी आपल्या कारकिर्दीत अध्यापन करताना आलेले अनुभव विशद केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *