ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा
ऐतिहासिक वास्तू हिरवाईने फुलविण्याचा संकल्प कार्यसिध्दीस नेणार -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शहरातील ऐतिहासिक वास्तू, डोंगररांगा, उजाड माळरानावर वृक्षरोपण व संवर्धन करण्याचा उपक्रम सातत्याने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा पाडण्यात आला असून, ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य रमेश वराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन करण्यात आले. यावेळी दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, अशोक पराते, मनोहर दरवडे, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, प्राज्ञीक खिरोडे, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, अशोक लोंढे, सुधाकर चिदंबर, रमेश त्रिमुखे, अभिजीत सपकाळ, सुंदर पाटील, दीपक घोडके, सुमेश केदारे, दिलीप बोंदर्डे, सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, विनोद खोत, बापू निमसे, अविनाश काळे, अब्बासभाई शेख, अविनाश जाधव, राहुल थोरात, सलाबत खान, अशोक दळवी, जालिंदर बेलेकर, किरण फुलारी, जालिंदर अळकुटे, रामनाथ गर्जे, जालिंदर बेरड, संजय भावसार, पांडुरंग आटकर, विठ्ठल राहिंज, विकास निमसे, विलास तोतरे, अजय खंडागळे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविली जाते. ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा केला जातो. प्रत्येक रविवारी ग्रुपचे सदस्य लावलेल्या झाडांना जाऊन स्वत: पाणी देत असतात. ही मोहिम वर्षभर चालू असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रुपच्या वतीने भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, भिंगार परिसरात लावण्यात आलेली झाडे जगविण्यात आली आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू हिरवाईने फुलविण्याचा संकल्प कार्यसिध्दीस जाणार आहे. मनुष्याला ऑक्सिजन रुपाने जीवन देण्याचे काम वृक्ष करतात. त्यामुळे जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.