• Thu. Dec 12th, 2024

सैनिक बँकेच्या सर्व शाखांची वार्षिक कॅश, ताळेबंद व बिलांची होणार तपासणी

ByMirror

Apr 6, 2022

तपासणी पथक नियुक्तीचे अप्पर निबंधकांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी बँकेत आवाढव्य खर्च टाकण्यासाठी बँकेचा आर्थिक वर्ष मार्च एन्ड लाबवित असल्याचा आरोप करुन, बँकेतील 31 मार्च 202 या मार्गील आर्थिक वर्षाचे सर्व शाखेतील कॅश, ताळेबंद, बोगस बिले तपासण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर करण्यात आलेल्या उपोषणाला यश आले आहे. अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी तपासणी पथकाची नियुक्ती करुन पथकाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. विविध कारणावरुन चर्चेत असलेल्या सैनिक बँकेच्या या तपासणी अहवालावरुन काय बँकेवर काय ठपका ठेवला जाणार व काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने प्रथेप्रमाणे या वर्षीही तीन दिवस उलटूनही 31 मार्च 2022 रोजी मागील आर्थिक वर्षाचे बँक कॅश, ताळेबंद बंद केले नसल्याने समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.4 एप्रिल) जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले होते. सैनिक बँकेत मुख्यकार्यकारी आधिकारी व चेअरमन अनेक वर्षे बँकेत नियमबाह्य कामकाज करत आहेत. शाखा अधिकारी यांना हाताशी धरत कर्जदाराच्या नावे हजारो रुपये नावे टाकत ती रक्कम वसुली हेडला जमा करायची आणि त्यानंतर बोगस बिले दाखखून रक्कम हडप करायची असा उद्योग गेली अनेक वर्षे राबवला जात आहे. अनेक वेळा तक्रारी केल्यावर सहकार खात्याने लेखापरीक्षणात ही बिले वसूल पात्र असल्याचा ठपका ठेवला असतानाही पुन्हा तोच फंडा याही वर्षी वापरण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पारनेर तालुका सैनिक सह बँकेतील पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा येथील सर्व शाखेत एकाच वेळेत जाऊन 31 मार्चची रोख कॅश तपासण्यात यावी, जानेवारी ते मार्च महिन्यातील बोगस बिले तपासावी व वार्षिक कॅश, ताळेबंद बंद करून शेरे देण्याची मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. या विषयांबाबत तपासणी पथकाची नियुक्तीचे लेखी पत्र मिळाल्याने समितीच्या वतीने उपोषण मागे घेण्यात आले आहे. या उपोषणात जिल्हा सचिव सुदर्शन बेलकर, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, रतन खत्री, पुरुषोत्तम शहाणे आदींनी सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *