देशाच्या कानाकोपर्यातून तर परदेशातून एकत्र आले मित्र-मैत्रिण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन साधला मनमोकळेपणे संवाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलच्या सन 1989 मधील इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आरण्यागिरी येथे निसर्गाच्या सानिध्यात पार पडला. या स्नेह मेळाव्यासाठी सर्व माजी विद्यार्थी देशाच्या कानाकोपर्यातून तर काही परदेशातून आले होते. जुन्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.
दरवर्षी सन 1989 मधील दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी शहरात एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवित असतात. मात्र कोरोनाच्या महामारीनंतर दोन वर्षांनी हे स्नेही मित्र एकवटले होते. या स्नेह मेळाव्याचे प्रारंभ राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हजारे यांना चरखा आणि महात्मा गांधीजी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. उपस्थितांनी हजारे यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधला.
तर स्नेह मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम आरण्यागिरीत उत्साहात पार पडला. दोन दिवस रंगलेल्या या सोहळ्यासाठी अमेरिका, दुबई, भुवनेश्वर, दावांनगिरी, हैदराबाद, वर्धा, मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, वडोदरा, कोल्हापूर आदी ठिकाणाहून वर्गमित्र, मैत्रिणी एकत्र आले होते. सुरवातीस सर्व मित्र-मैत्रिणींनी मनोगते व्यक्त केली. सामाजिक, व्यावसायिक, नोकरी आणि कुटूंब सांभाळतांना शाळेचे संस्कारच कामी आल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले.
बालपणीच्या गमती जमती आणि सध्याची सुख-दुःखे जुन्या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांशी बोलले. सीमा शेट्टी, शीतल शिरसाठ, शुभांगी जाधव, किरण सावला, नीता तांबे यांनी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. या स्नेह मेळाव्याचे नियोजन हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, संजय असणानी, गौतम बोरा, अश्विनी गोलांडे, गीता तांबे, किशोर रंगलानी, किरण उजागरे यांनी केले होते.
कार्यक्रमासाठी कैलास बजाज, नाझीश शेख, धीरज दीपनाईक, रक्षित शाह, प्रिन्सिका अगरवाल, तनुजा मुलतानी, मनीषा जगताप, कविता चिंचने, मंगेश काळे, गिनी सबलोक, कमलेश भिंगारवाला, झंवर नगरवाला, अनुपमा कोरे, मंगेश काळे, विजय खडके, गणेश पुरम, विक्रम म्हस्के, श्रीनिवास फिरकोज, महेंद्र अनमल, हृषिकेश मोहिले, मयुरेश नांदुरकर, निरंजन घोंगडे, सुदिश मणी, महेश बजाज, समीर शेख, मिर्झा बेग, सागर पटवा, निसार सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंकज दाभाडे, कृष्णा लोळगे, निरंजन घोंगडे, देवेंद्र गुजराती, रवी सचदेव, बीनोद बॅनर्जी यांनी परिश्रम घेतले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….