सावित्रीबाईंनी प्रवाहा विरोधात जाऊन समाजाच्या व महिलांच्या उत्कर्षासाठी कार्य केले -सचिन जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे, प्रा. अनुरिता झगडे, भिंगार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, उपाध्यक्ष किरण जावळे, सरचिटणीस गणेश बोरुडे, फुले ब्रिगेड भिंगार अध्यक्ष संतोष हजारे, बाळासाहेब पठारे, लहू कराळे, ऋषीकेश ताठे, युसुफ सय्यद, अब्दुल खोकर आदी उपस्थित होते.
सचिन जगताप म्हणाले की, आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज आहे. स्त्री शिक्षणाने आज समाजात क्रांती झाली. स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या व महिलांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तुत्ववानस्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन खर्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचे बीज रोवले. समाजाचा विरोध झुगारुन त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्याने आज स्त्रीयांना समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे. स्त्री शिक्षणाने सावित्रीबाईंनी अंधारलेला समाज प्रकाशमान केल्याचे त्यांनी सांगितले.