बालगृहातील विद्यार्थी आणि रोकडेश्वर मंदिरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
तर अरुणोदय गो शाळेला चारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढदिवसाला प्रतिष्ठेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करुन, चौका-चौकात केक कापण्याची रितच बनत चालली असताना, सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शहरातील निरीक्षण व बालगृहातील (रिमांड होम) विद्यार्थी व भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरात निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. तर अरुणोदय गो शाळेतील जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उपक्रम राबविण्यात आले.
विनायक लोखंडे, वैभव म्हस्के व मनिष फुलडहाळे यांच्या नियोजनाने पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी दादा दरेकर, निलेश बांगरे, वैभव म्हस्के, अक्षय भिंगारदिवे, विनायक लोखंडे, सोनू दरेकर, पवन कुमटकर, वैभव शेवाळे, सुमित कुलकर्णी, सलमान बेग, अजय शेडाळे, विशाल म्हस्के, राजेश तुजारे, सिध्दार्थ भिंगारदिवे, आकाश कोशिंबीरे, उदय म्हस्के, राम झिने, दादा शिंदे, प्रितेश दरेकर, योगेश पाडळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता सामाजिक जाणीव ठेऊन योगदान देत आहे. वंचितांसमवेत आनंद वाटल्याने तो द्विगुणीत होतो. वाढदिवशी मोठा खर्च करुन सेलिब्रेशन करण्याचा चुकीचा पायंडा पडत आहे. युवकांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याची खरी गरज आहे. उपेक्षितांना दिलेला आनंद व केलेली मदत परमेश्वराची सेवा असून, यामुळे खरा वाढदिवस साजरा होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गजेंद्र भांडवलकर म्हणाले की, वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यापेक्षा इतरांना आनंद देण्यात खरे समाधान आहे. सामाजिक भावनेने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थी सेलची धुरा सांभाळताना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा दिला. पक्षाने कामगारांची जबाबदारी सोपवली असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.