• Wed. Dec 11th, 2024

सर्वसामान्यांच्या गरजा व प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करुन, गरजा नसलेल्या गोष्टींना केंद्राकडून प्राधान्य -प्रा. माणिक विधाते

ByMirror

Jun 6, 2022

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत मिस्किन मळा येथे बैठक


राजकीय परिस्थितीवर रंगलेया चर्चेत महागाई व बेकारीच्या मुद्दयांवरुन केंद्र सरकारवर निशाणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वसामान्यांच्या गरजा व प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करुन, गरजा नसलेल्या गोष्टींना प्राधान्य देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांना जीवन जगण अवघड झाले असून, युवकांच्या बेकारीचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे. महाराष्ट्राची भूमिका देशात कर्त्याची राहिलेली असून, सर्वाधिक कर देऊनही महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा देण्यात आलेला नसून राज्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक 4, सावेडी मिस्किन मळा येथील गंगा उद्यानात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. विधाते बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अ‍ॅड. प्रसाद डोके, साधनाताई बोरुडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अ‍ॅड. रवींद्र शितोळे, दीपक जाधव, सतीश शिंदे, गोकुळ गोधडे, सनी सत्राळकर, विशाल बेलपवार, अक्षय आढाव, सचिन दारकुंडे, हर्षल बांगर, शुभम ढवळे, सौरभ चोळके, चिंटू गंभीर, प्रतीक भोंगे, कैलास नवलानी, आयुष लहारे, सौरभ पाटील, आशुतोष लहारे, तुषार म्हस्के,राहुल जाधव, रणवीर शितोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर म्हणाले की, शहराची मनपा छोटी असून, जमा होणारा महसूल तटपुंजा आहे. मात्र विकासाचा खर्च मोठा असून, आमदार संग्राम जगताप राज्य सरकारकडून भरीव निधी आणून शहराचा विकास केला जात आहे. शहराला शहराची ओळख देण्याच्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरु आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. रवींद्र शितोळे यांनी केंद्र सरकार महागाईकडे लक्ष विचलित करण्यासाठी चुकीच्या पध्दतीने राजकारण करुन इतर भावनिक मुद्दे हाताळत आहे. नागरिकांनी जागृक होण्याची वेळ आली असून, अच्छे दिनाच्या प्रतिक्षेत देश दिवाळखोरीच्या उबरठ्यावर पोहचला आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. ओबीसी आरक्षण इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारकडे असूनही दिला नाही. महाविकास आघाडी सरकार विरोधात अपप्रचार केला जात आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न केंद्र स्तरावर प्रलंबीत असून, कामगार आणि शेतकरी विरोधातील भांडवलदारांचे सरकार सत्तेवर असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीसाठी परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमित खामकर यांनी मानले आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *