• Wed. Dec 11th, 2024

समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने योगदान द्यावे -जनक आहुजा वासन परिवाराच्या वतीने केडगावच्या सावली संस्थेच्या विद्यार्थ्यांना पादत्राणे भेट

ByMirror

Feb 6, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला देणे लागते या भावनेने प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. समाजाने आपल्याला काय दिले? यापेक्षा आपण काय देतो? ही भावना महत्त्वाची आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून गरजू घटकांना मदत करण्याची गरज आहे. व्यवसाय करताना वासन परिवार सामाजिक बांधिलकी जपून कार्य करत आहे. व्यवसायाबरोबर समाजातील गरजूंना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन जनक आहुजा यांनी केले.


केडगाव येथील सावली संस्थेच्या विद्यार्थ्यांना वासन परिवाराच्या वतीने पादत्राणे व फळांचे वाटप करण्यात आले. उद्योजक विजय वासन व तरुण वासन यांच्या संकल्पनेतून कु. प्रणया तरुण वासन हिच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी घर घर लंगरसेवेचे हरजितसिंह वधवा, अनिश आहुजा, मनोज मदान, किशोर मुनोत, कैलाश नवलानी, दिपक जोशी, अविनाश अडवोलकर, प्राची जामगावकर, शाम भिंगारदिवे, किरण केळकर, सावली संस्थेचे संस्थापक नितेश बनसोडे, अधीक्षक अजिंक्य आंधळे, मनिषा प्रधान, अर्चना मंडलिक आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात अनिश आहुजा यांनी वासन परिवाराच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. नितेश बनसोडे यांनी सर्व नगरकरांना अभिमान वाटावा याप्रमाणे घर घर लंगर सेवेने मोठे कार्य केले. भुकेलेल्यांना दोन वेळचे जेवण देऊन अनेक गरजू घटकांची भूक भागवली. इच्छा शक्तीमुळे हे मोठे कार्य शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा यांनी घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहिती देत आलेले अनुभव विशद केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले इतनी शक्ती हमे देना दाता!…, या प्रार्थना गिताने झाली. सावली संस्थेच्या वतीने अजिंक्य आंधळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *