चर्मकार विकास संघाच्या वतीने स्वागत
संत गुरु रविदास महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज -संजय खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- संत गुरु रविदास महाराज संदेश रथयात्रेचे नुकतेच शहरात आगमन झाले. सावेडी येथील चर्मकार विकास संघाचे मुख्य कार्यालया समोर या रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सर्जेराव गायकवाड, कवि सुभाष सोनवणे, दिनेश देवरे, अरुण गाडेकर, अदिनाथ बाचकर, नानासाहेब कदम, पाराजी साळे, निलेश आंबेडकर, विनोद कांबळे, मनिष कांबळे, अशोक आंबेडकर, संदिप सोनवणे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, आकाश गायकवाड, रोहित उदमले, भिकाजी वाघ, ज्ञानेश्वर वाघमारे, भानुदास नन्नवरे, आशाताई गायकवाड, लताताई वाघमारे, प्रतिभा खामकर यांच्यासह मोठ्या संखेने महिला व समाज बांधव उपस्थित होते.
संत गुरु रविदास महाराज संदेश यात्रेचे प्रमुख अशोक लहाने यांच्यासह संदेशयात्रे सोबत सहभागी झालेल्यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केले. अशोक लहाने यांनी संत रविदास महाराज संदेश यात्रेचा उद्देश तसेच संत रविदास महाराज यांचा प्रचार-प्रसार संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु असल्याचे सांगितले. 36 जिल्हात व 250 पेक्षा जास्त शहर व गावात संत रविदास महाराज यांच्या संदेश यात्रेचे समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, घरोघरी रविदास महाराजांचे विचार पोहचविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय खामकर म्हणाले की, उन्हाळ्यात अनेक शहरामध्ये 40 डिग्रीच्या वर तापमान असताना संत रविदास महाराजांचे कार्य व विचाराच्या प्रसारासाठी सुरु असलेली संदेश यात्रा प्रेरणादायी आहे. रविदास महाराजांच्या विचाराने समाज एकजुट होण्यास मदत होणार असून, यामुळे विकास साधला जाणार आहे. रविदास महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज आहे. युवकांच्या जीवनात रविदास महाराजांच्या विचाराने बदल घडणार आहे. या चळवळीस अखिल भारतीय धर्म संघटन व चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
गोपीनाथजी गाडे महाराज यांनी संत रविदास महाराजांचे डोहेच्या माध्यमातून विचार मांडून, संत रविदास महाराज यांची आरती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.